पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेतून शरद पवारांचा भटकता आत्मा असा उल्लेख केला. त्यानंतर आता राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटातील नेते टिका करतांना दिसत आहेत. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी राज्यात शरद पवार यांच्याविरोधात मोठं षडयंत्र सुरू असल्याचं विधान केलं आहे.
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंविरोधात धनशक्तीचा वापर, व्हिडीओ पाहा,” रोहित पवारांचा मोठा दावा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात पवार नाही तर शरद पवार फॅक्टर आहे. गेले काही दिवसापासून राज्यात जे काही सुरू आहे. ते फक्त शरद पवारांच्या विरोधात आहे. कारण शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार असं समीकरण झालं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला लगेचच दिसून येईल. पहिल्या दिवसापासून चंद्रकांत पाटलांनी बारामतीत येऊन आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे. असं म्हणाले होते. त्यामुळे हे सगळं जे काही कट कारस्थान षडयंत्र सुरू आहे. ते फक्त शरद पवारांचा विरोध म्हणून सुरू आहे. असेही सुळे म्हणाल्या.
सोलापुर, सांगली मतदारसंघातील परिस्थिती पाहिली तर याठिकाणी भाजपचे खासदार आहेत. आज सोलापुरमध्ये पंधरा दिवस पाणी मिळत नाही. जलजीवन मिशन असेल वयोश्री योजना असेल, मोठे रस्ते असतील या सगळ्यांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील एक टीम वर्क म्हणून अतिशय चांगलं काम झालं आहे. त्यामुळे लोकशाही असल्याने विरोधक माझ्यावर टिका करणारच ना. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना गप्प केलं.
दरम्यान, गेले 35 वर्ष आदरणीय अजित पवार याठिकाणी आमदार आहेत. मी अठरा पंधरा वर्षे खासदार आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघात दुष्काळ मिटवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत. पाण्याचा प्रश्न हा गंभीर असून राजकारण बाजूला ठेऊन त्यात सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. पुरंदर, दौंड, पुरंदर, आणि बारामती या चार ही तालुक्यांमध्ये पाण्याची अडचण येणार नाही. यासाठी गेले अनेक दिवस आम्ही प्रयत्न करत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा….“आमच्यावर टीका केल्याशिवाय अनंत गितेंना रात्री झोप येत नाही”, भरत गोगावलेंनी डिवचलं
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनेत्रा काकांनी मतदान करा,” अंकिता पाटलांचं मतदारांना आवाहन
हेही वाचा…“कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या..,”अन् अजितदादांनी भरसभेत शेतकऱ्यांची जिंकली मनं