बीड : गेल्या अनेक दिवसांपासून बीड लोकसभा मतदारसंघातून दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती. मात्र पवारांनी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली. तर महायुतीकडून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. त्यातच ज्योती मेटे या वंचित किंवा अपक्ष म्हणून निवडणुक लढवतील. अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आज बीड लोकसभा न लढविण्याचा निर्यण ज्योती मेटे यांनी जाहीर केला आहे.
हेही वाचा..“माढा मतदारसंघात कथित चाणक्याचं विशेष विमान क्रश ! तुतारीचे ‘उत्तम’ स्वर गुंजणार!
ज्योती मेटे यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, गेल्या काही काळामध्ये माझ्या उमेदवारीबाबात उत्सुर्फ प्रतिसाद येत होती. जनतेचा स्वाभिमान जपण्यासाठी लोकसभा निवडणुक लढवी असं मला सांगण्यात येत होतं. त्यासाठी शासकीय सेवेतून निवृत्ती घेऊन यामध्ये सक्रीय झाली होती.उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्याकडे असलेले खुले पर्याय याचा सखोल पणे विचार करण्यात आला.
हेही वाचा…इंदापुरमधून भरघोस मताधिक्य देऊ, हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांना ग्वाही
शिवसंग्राम तर्फे इतरांच्या सहाय्याने निवडणुक लढविण्याचा पर्याय आमच्याकडे होता. याचा विचार करत दबाव किंवा इतर प्रलोबने न बघता माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे. समाजहिताकरीता कधीही व्यक्तिगत तडजोड न करणाऱ्या दिवंगत नेते विनायक मेटे यांची पत्नी असल्याने याची नेहमी जाण ठेवली आहे. त्यामुळे बीड लोकसभा निवडणुक लढवत असताना पुढे काय करायचा ? हा प्रश्न आल्यानंतर सगळ्यांची चर्चा केली. त्यावेळी हा निर्णय अनुकुल ठरला असता. परंतु लोकभावनेचा आदर करून ज्या भावनेने साहेबांनी आदर केला होता. व्यापक जनहिताचा निर्णय घेऊन विचारात घेऊन बीड लोकसभा २०२४ न लढवण्याचा निर्णय जाहीर करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर त्याला शरद पवारांचा पाठिंबा”
हेही वाचा…आढळरावांनी प्रचारात घेतली मोठी आघाडी, हडपसर मतदारसंघात लोकांचा मोठा प्रतिसाद
हेही वाचा…बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार
हेही वाचा…तटकरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला, सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी अनिकेत तटकरे सक्रीय