पुणे : लोकसभा निवडणुकीचा संपुर्ण देशात रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यासाठी कसून कामाला लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांची इंडिया आघाडी भाजपला पराभूत करण्यासाठी कामाला लागली आहे. अशातच पंतप्रधान पदाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा…Live Ajit Pawar | अजित पवारांच्या हस्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बारामतीतून सुरूवात
जर उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर त्यांच्या नावाला शरद पवार हे पाठिंबा देतील. शरद पवारच नाही तर देशातील अनेक प्रमुख नेते हे उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देतील. पंतप्रधानपदाचा मान महाराष्ट्राला मिळावा असं आम्हाला वाटतं. शरद पवार हे पंतप्रधान होतील असं आम्हाला वाटत होतं. आम्ही शरद पवारांकडे मोठ्या आशेनं पाहात होतो. मात्र अंतर्गत वादामुळे ते शक्य होऊ शकलं नाही. असेही राऊतांनी म्हटलंय.
हेही वाचा…“मोदींविरोधात जनतेत संतापाची लाट “, लातुरमधून बाळासाहेब थोरांताचा हल्लाबोल
यातच देशात इंडिया आघाडीच्या ३०० पेक्षा जास्त जागा निवडून येतील. जर राज्यात महाविकास आघाडीला ३५ पेक्षा अधिक जागा मिळतील. तर अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही. भविष्यात ते भाजपात विलीन होतील. असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय.
दरम्यान, इंडिया आघाडीत निवडणूक झाल्यानंतर एकत्र बसू आणि पर्याय देऊ, काही ठिकाणी जागेवरून मतभेद होत असतात. पण मतभेदाकडे लक्ष द्यायचं नाही. निवडणूक लढवायची, जागा जिंकायची आणि जिंकल्यानंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. त्यावेळी आम्हाला कोणालाही पुढं करता येईल आणि स्थिर सरकार शक्य असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आढळरावांनी प्रचारात घेतली मोठी आघाडी, हडपसर मतदारसंघात लोकांचा मोठा प्रतिसाद
हेही वाचा…बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार
हेही वाचा…तटकरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला, सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी अनिकेत तटकरे सक्रीय
हेही वाचा..“माढा मतदारसंघात कथित चाणक्याचं विशेष विमान क्रश ! तुतारीचे ‘उत्तम’ स्वर गुंजणार!
हेही वाचा…इंदापुरमधून भरघोस मताधिक्य देऊ, हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांना ग्वाही