धाराशिव : महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी काल मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत सहभाग घेतला. यावेळी महायुतीचे सर्वच नेते उपस्थित होते. यातच धाराशिव मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या सुरेश बिराजदार यांची नाराजी दुर करत अजित पवारांनी त्यांना एक शब्द दिला आहे.
हेही वाचा…अखेर ठरलं ! मुरलीधर मोहोळांसाठी पुण्यात ‘या’ दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा
अजित पवार गटाकडून धाराशिव लोकसभेसाठी सुरेश बिराजदार यांना निवडणुकीसाठी तयारी करण्याचे अजित पवारांनी आदेश दिले होते. मात्र महायुतीच्या नेत्यांनी तसेच अजित पवारांनी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने बिराजदार थोडे नाराज झाल्याचे दिसून आले. तरी देखील बिराजदार यांनी अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी हिरीरीने सहभागी झालेत.
हेही वाचा…बीड लोकसभेतून ज्योती मेटे यांची माघार, पत्रकार परिषदेतून केली घोषणा
यातच काल उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता भरसभेत अजित पवारांनी सुरेश बिराजदार यांना लोकसभेऐवजी विधानपरिषदेवर संधी देऊ असं आश्वासन दिलं. यावरून अजित पवारांनी धाराशिवमधील डॅमेज कंट्रोल दुर करण्याचा प्रयत्न केला. त्याआधी अजित पवार यांनी धाराशिवमधील माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या घरी भेट दिली. यावेळी अजित पवारांनी पाटील कुटुंबांशी संवाद साधला.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून ठाकरे गटातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ओमराजे निंबाळकर यांनी चांगला जनसंपर्क तयार केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर आमनेसामने आले होते. यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या लढतीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आढळरावांच्या प्रचारासाठी महेश लांडगे मैदानात, भोसरी मतदारसंघात बैठकांचा सपाटा
“कोकणाचे नंदनवन केल्याशिवाय गप्प बसणार नाही”, तटकरेंनी नागरिकांना दिलं आश्वासन