पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येणार असल्याची माहिती देण्यासाठी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत भाजपमध्येच मोठा वाद दिसून आला आहे. पक्षाचा प्रोटोकॉल तोडून आमदार अश्विनी जगताप यांना कडेला बसण्यासाठी खुर्ची देण्यात आल्याने शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांच्यावर अश्विनी जगताप भयंकर चिडल्या. अशा पद्धतीने महिलांचा जाहीर अपमान केला जात असून महिला म्हणून पक्षात वरचेवर दुर्लक्ष केले जात असल्याचं सांगत नामदेव ढाके यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षात आँल इज नॉट वेल अशीच स्थिती मागणी काही दिवसापासून सुरू आहे. कार्यकारिणीत सामील करून न घेतल्याने काही कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मागच्या कार्यकारणीत उपाध्यक्ष असलेले आणि अश्विनी जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले राम वाकडकर यांनी ढाके यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी यासंदर्भात एक पत्रकच काढले होते. यातच आता थेट बावनकुळे यांना भेटून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं बोललं जातंय.
अश्विनी जगताप यांचा अपमान करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी वाकडकरांनी केलीय. पत्रकार परिषदेत जगतापांना बसण्यासाठी कडेला खुर्ची ठेवली होती, हे हेतुपुरस्सर केले आहे. यानंतर जगताप यांनी थेट इशारा दिला. मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे माझ्या नादी लागू नका पाठीमागून वार करू नका. असा थेट इशारा जगताप यांनी दिला.