IMPIMP
Break 941 works of Aghadi NCP leaders along with Ajit Pawar meet the Chief Minister Break 941 works of Aghadi NCP leaders along with Ajit Pawar meet the Chief Minister

आघाडीच्या 941 कामांना ब्रेक; अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आघाडीतील अनेक कामांना त्यांनी स्थगिती दिली. यामध्ये राष्ट्रवादीच्या बऱ्याच मंत्र्यांच्या कामांना एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ यांसारख्या मंत्र्यांचा याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच आज अजित पवार, छगन भुजबळ. हसन मुश्रीप, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास गेले.

“दुसऱ्याच्या घरातील जेवणाचा खर्च मी का देऊ? राऊतांच्या आरोपावर पाटलांचे स्पष्टीकरण 

एकनाथ शिंदे यांनी मार्च ते जून 2022 मध्ये मंजूर झालेल्या नगरविकास विभागाच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती. या कामांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुचवलेली कामांचा समावेश आहे. तसचे यामध्ये बारामती नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला होता. तो आता नव्या सरकारने थांबविला आहे. त्यामुळेच अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

“एकाही आमदाराची भावना नाही की, भाजप सोडून दुसरीकडे जावे” 

सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी माजी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा झटका दिला. दोन दिवसांपुर्वी झालेल्या नाशिक जिल्हा नियोजन कार्यसमितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या 567 कोटींच्या निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक दिला होता. यासंदर्भात नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या तक्रारीची एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली होती.

“ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे, असेच लोक निवडणुक जिंकू शकतात” 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीलाच नाहीतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील धक्का दिला. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या विविध नामांतराला देखील स्थगिती दिली. शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले सर्व निर्णयांना स्थगिती देत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा कॅबिनेट बैठक घेऊन त्यांना मान्यता दिली. त्यामुळे आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना एकनाथ शिंदे यांच्याकडून ब्रेकच लावला जात आहे.

Read also