गांधीनगर : बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर असदुद्दीन ओवेसींच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम) पक्षाचा विश्वास वाढला असून, देशभरातील स्थानिक व विधानसभा निवडणुकांवर एमआयएम लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. पश्चिम बंगालनंतर आता एमआयएमने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या गुजरातमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गुजरातमधील आगामी स्थानिक व विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने छोटूभाई वासवा यांच्या भारतीय ट्राइबल पार्टी (बीटीपी) सोबत हातमिळवणी केली आहे. हे दोन्ही पक्ष गुजरातमधील आगामी निवडणुका एकत्र लढणार आहेत याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी माहिती दिली.
Bharatiya Tribal Party (BTP) and AIMIM will contest together the next Assembly election in Gujarat. Asaduddin Owaisi (AIMIM chief) has asked me to visit Gujarat and hold discussions with BTP leaders: Imtiyaz Jaleel, AIMIM MP from Aurangabad, Maharashtra pic.twitter.com/cziYARQuth
— ANI (@ANI) December 26, 2020
मला ओवसींकडून गुजरातला जाऊन बीटीपीच्या नेते मंडळींशी पुढील रणनीती संदर्भात प्राथमिक चर्चा करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये मी गुजरातला जाणार असल्याचे जलील यांनी सांगितले.
छोटूभाई वासवा यांनी देखील ट्विट करत आगामी निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती दिली आहे.