पुणे : महापुरूषांनी शाळा चालवतांना भीक मागून चालविली होती. असं वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याचे पडसाद राज्यभरात बघायला मिळाले. तर चंद्रकांत पाटलांवर राज्यातील राजकीय नेत्यांनी कडाडून टिका केली तर एका व्यक्तींनी चंद्रकांत पाटलांवर शाई फेकून केली. त्यावर आता पुन्हा शाई फेकणार असल्याची धमकी चंद्रकांत पाटलांवर आल्याने त्यांनी एका कार्यक्रमात खबरदारी म्हणून त्यांनी तोंडावर फेसमास्क घातला.
महापुरुषांचा अपमान केल्यानंतर चंद्रकांत पाटलांवर शाई फेक हल्ला केला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा देखील करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा शाई फेकण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात तोंडावर फेसमास्क लावला. त्याचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
“खोके, तोतये, लंफगे, पाठीत वार, महाराष्ट्र द्रोही,,,” मुंबईत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर एल्गार
दोन दिवसापुर्वी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरून राष्ट्रवादीने मैदानात उतरून चंद्रकांत पाटलांचा निषेध व्यक्त केला. तर आज झालेल्या महाविकास आघाडीच्या महामोर्चात देखील चंद्रकांत पाटलांचा समाचार घेण्यात आला.
Read also
- अन्, स्टेजवरच सुषमा अंधारेंनी शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचे घेतले आशीर्वाद, भाजपची टिका
- “राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट तेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो” ; अजित पवार
- “देवेंद्रजी…! Cool Down, तुमचा जळफळाट आम्ही समजू शकतो”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
- “उद्धव ठाकरेंनी आपला स्क्रिप रायटर बदलावा”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
- “राज्यपालांची हकालपट्टी करा नाही तर..;” शरद पवारांचा महामोर्चातून मोठा इशारा, महाराष्ट्र पेटणार..?