मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कामासोबतच, आपल्या पोषाखामुळे देखील अनेकदा चर्चेत असतात. ज्या समुदायाशी अथवा एखाद्या राज्यातील जनतेशी संवाद साधायचा असेल तर पंतप्रधानांनी तेथील परंपरेनुसार साजेसे कपडे घातल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पंतप्रधान मोदींचा फिरन (लांब थंडीतील कोट) घातलेला असाच एक फोटो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेअर केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील नागरिकांशी चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी हा फोटो शेअर केला होता. आता हाच फोटो चंद्रकांत पाटील यांनी शेअर केला असून, सोबतच असे पंतप्रधान आपल्याला लाभणे सौभाग्यच आहे, असे म्हटले आहे.
मा. @narendramodi जी यांची दूरदृष्टी आणि देशाच्या विकासासाठी अविरत परिश्रम करण्याची जिद्द त्यांच्या या छवीतुनच दिसून येते. असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच! pic.twitter.com/bia2F3hZnf
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 27, 2020
पंतप्रधान मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हाच फोटो शेअर करत चंद्रकांत पाटील यांनी, “नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि देशाच्या विकासासाठी अविरत परिश्रम करण्याची जिद्द त्यांच्या या छवीतुनच दिसून येते. असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच! असे म्हटले आहे.