पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोणत्याही राज्यात दौऱ्यासाठी गेले की त्या राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे स्वागत केले जाते. मात्र पंतप्रधानांच्या आजच्या पुणे दौऱ्याला थेट पंतप्रधान कार्यालयाकडून राजकीय व्यक्ती आणि पदाधिकारी यांना स्वागत आणि निरोपाला उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात राज्याकडून होणाऱ्या स्वागताला ना राज्यपाल उपस्थित राहू शकतील, ना मुख्यमंत्री.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच परतणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे. या सुचनेमुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पंतप्रधानांचे आगमन व दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लस निर्मिती प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील कामाबाबत पाहणी करणार आहेत. ते यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया मध्ये भेट देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी सकाळी 9.30 वाजता अहमदाबादमध्ये भेट दिली. त्यानंतर ते दुपारी 1.30 पर्यंत भारत बायोटेक, हैदराबादला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यात येतील. पुण्यात सीरम इंस्टीट्यूटला ते 4:30 वाजता भेट देतील अशी माहिती आहे.
Read Also –
“या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए”; फडणवीसांकडून ठाकरे सरकारची चिरफाड
“महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे?”
“उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात कधीच पाहिला नाही”