पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसतात. परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता होती
नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजेच ३० जुलै रोजी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुणे दौरा करणार आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात चर्चा करण्याची चिन्हं आहे. ससून किंवा नायडू यासारख्या एखाद्या रुग्णालयाला मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
दरम्यान, ण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासंदर्भात उपयायोजनांसाठी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे बैठक पार पडली. आता पुणे जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशाने काम करणार असून कंटेन्मेंट झोनमध्ये घराघरात जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी ठरलेल्या वेळेत पार पाडली जाणार आहे.