मुंबई : राज्यात एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरवर जाब विचरला आहे. ‘मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या राज्यात? ही शिवशाही नाही तर मोगलाई फोफावत आहे’, अशा शब्दात चित्रा वाघ कडाडल्या आहेत
‘कोल्हापूरात गर्भवती महिलेवर सामुहीक बलात्कार, औरंगाबादमध्ये ही सामुहीक बलात्काराची घटना, वाशिम मध्येही चालत्या खाजगी बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आजच्या एका दिवसातल्या या तीन घटना आहेत. मुख्यमंत्री महोदय काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात. ही शिवशाही नाही, ही तर मोगलाई फोफावतेय’, असं चित्रा वाघ म्हणाल्या कोल्हापुरात गर्भवती महिलेवर बलात्कार
कोल्हापुराच्या रायगड कॉलनीत एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला आसामवरून गुंगीचे औषध देऊन कोल्हापूरात आणले. महिलेच्या मर्जीविरुद्ध पीडितेशी संबंध ठेवल्याचा तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून संशयितांचा शोध सुरु आहे.
सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत वाराणसीहून आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी वाराणसीवरुन आपल्या नातेवाईकांसोबत औरंगाबादेत आली होती. पण ही तरुणी रस्ता चुकली त्यामुळे तिची आणि नातेवाईकांची भेट होत नव्हती. त्यावेळी तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा घाटी रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Read Also
“एकीकडे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला कडाडून विरोध करायचा अन् दुसरीकडे…
किरीट सोमय्यांचा निशाणा सतत शिवसेनरवरच का? पक्षातून बाहेर काढल्याचा राग कि आणखी काही?