मुंबई : विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस महाविकासआघाडीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हि यादी राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचं नाव असणार का याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती दिली. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले. त्यामुळे आता या यादीबाबत उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.
Read Also :