भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचं आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटलांच्या घोषणेनंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया देत हो सके तो लौट के वापस आना’ अशी साद खडसेंना घातली आहे
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, खडसेंनी जाऊ नये अस मनापासून वाटतं. त्यांचा हा पक्षप्रवेश भाजप पक्षासाठी धक्कादायक बाब आहे. खडसेंचे पक्षासाठी असलेले योगदान हे खूप मोठे आहे. त्यामुळे पक्षाने चिंतन करण्याची गरज आहे. ते अत्यंत जवळचे सहकारी होते. ‘हो सके तो लौट के वापस आना’ असे म्हणत खडसेंना मुनगंटीवार यांनी साद घातली आहे.
तसेच, खडसेंचा पक्षांतर्गत सुरु असलेला वाद संपेल असं मला वाटायचं, पण जे होतंय ते दुःखदायक आहे. खडसेंचा राजीनामा ही आमच्यासाठी निश्चितचं चिंतनाची बाब आहे. पण आता त्यांनी निर्णय घेतला आहे तर “खुश रहे तुम सदा ये दुवा है मेरी” हेच आम्ही म्हणू शकतो.” अशी भावनिक प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.
Read also :
“खडसे, आता तुम्ही दिल्या घरी तरी सुखी राहा” https://t.co/Cg6JkRlEmK @raosahebdanve @EknathGKhadse @BJP4Maharashtra @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020