पुणे : सध्या राज्यात आलेली महामारीची भयानक लाट ओसरत असल्याची चिन्हे दिसत असून, ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार होते. त्यानुसार, शहरातील बाधितांची संख्या घातल्याने आणि ४०% पेक्षा अधिक बेड शहरातल्या रूग्णांलयांमध्ये उपलब्ध असल्याने, आजपासून महापालिकेनेही शहरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली असून, नवी नियमावली पुढच्या १० दिवसांसाठी पालिकेने लागू केली आहे.
उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व दुकानांना परवानगी !
पुणे मनपा हद्दीतील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु करण्यास परवानगी दिली असून शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. PMPML, हॉटेल्स, उद्याने, जिम आदी आस्थापना बंदच राहतील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 31, 2021
पुणे महापालिकेचे नवीन आदेश…
- शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सर्व दिवस स. ७ ते दु. २ या वेळेत सुरू राहणार.
- बँकांचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार.
- इतर दुकाने सोम-शुक्र स. ७ ते दु. २ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार.
- रेस्टॉरंट-बार फक्त पार्सल आणि घरपोच सेवेसाठी सुरू.
- ई- कॉमर्सला अत्यावश्यक वस्तू आणि सेवा, तसेच इतर वस्तू यांची घरपोच सेवा करण्यास मुभा.
- शहरात दु. ३ नंतर वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा सोडून नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई.
- शासकीय कार्यालयांत २५ % अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहू शकतात.
- शेती संबंधित दुकाने आणि संबंधित आस्थापना, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, सर्व दिवस स. ७ ते दु. २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा.
- मद्याविक्री दुकाने सर्व दिवस स.७ ते दु.२ पर्यंत ठेवण्यास परवानगी.
काय बंद असणार?
- सिनेमागृह, नाट्यगृह, ऑडिटोरियम, मनोरंजन-अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल
- सर्व प्रकारचे शूटिंग बंद असणार
- उद्याने, मोकळ्या जागा, मैदाने
- सर्व प्रकारची धार्मिक स्थळे
- पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
- सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलने
- मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आठवडी बाजार
- लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ यावरील निर्बंध कायम
पुणेकरांनो, माझी कळकळीची विनंती…
पुणे शहरात आपण बहुतांशी निर्बंध शिथिल केलेले असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, पण ते तुम्हा सर्वांच्या साथीशिवाय शक्य नाही. बाहेर वावरताना प्रचंड काळजी घ्या. स्वतः सुरक्षित राहा, कुटूंबालाही ठेवा !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 31, 2021
Read Also :