मुंबई: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे परिसरात पोस्टरबाजी करण्यात आलीय. सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रताप सरनाईक गायब आहे. त्यामुळे ‘ओवळा-माजिवाडा मतदारसंघ वाऱ्यावर, आमदार महोदय कागदावर’, ‘ओवळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?’ अशा आशयाची पोस्टरबाजी सरनाईक यांच्याविरोधात करण्यात आल्याचं ठाणे परिसरात पाहायला मिळत आहे. या पाश्वभुमिवर भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरिट सोमया आणि आमदार डावखरे यांनी वर्तनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
आमदार प्रताप सरनाईक कुठे आहेत..?
म्हणून मी, आ.निरंजन डावखरे व ओवाळा माजीवाडाचे मतदार यांनी आज वर्तक नगर पोलिस स्टेशनला गायब आमदारांची तक्रार नोंदवली!
आमदार मातोश्री मध्ये लपले आहेत का?
आज 100 दिवस झाले ते गायब आहेत, कोविड आपत्तीच्या काळात जनतेला गरज असताना आमदाराचा पत्ता नाही pic.twitter.com/RiD9mPpxbR
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 19, 2021
हे पण वाचा: ‘मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही’; अजित पवारांची घोषणा
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे शंभर दिवस झाले गायब आहेत. कोरोनासारख्या महामारी बिमारीमध्ये हजारो नागरिक कोरोना बाधीत झाले आहेत. मात्र आमदार प्रताप नाईक यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. त्यांना जनता कधिच माफ करणार नाही. माझा उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे, की आमदार काय फक्त मातोश्रीवर बसण्यासाठीच आहेत. असे किरीट सोमया म्हणाले.
हे पण वाचा: अजितदादांनी चमकोगिरीसाठी पुणेकरांना संकटात ढकलले – महापौर मोहोळ
ईडी आणि सीबीआयचे धाडसत्र
मागील महिन्यात ED आणि CBI ने प्रताप सरनाईक यांच्या लोणावला इथल्या एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकली होती. त्याबरोबर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ED ने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ED ने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती. ही चौकशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात आपण ED ला सहकार्य करण्यासाठीही तयार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते.