मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात मित्र पक्ष असलेल्या भाजपने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर पालिकेत विरोधाची भूमिका घेतली. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे बीएमसीत भाजपची चांगलीच गोची झालेली पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भाजपकडून नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची विरोधी पक्षनेतेपदासाठी आणि गटनेतेपदासाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र महापौर पेडणेकर यांनी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता नेमला. त्यामुळे दुसरा विरोधी पक्षनेता नेमता येणार नाही असे सांगत त्यांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी मोठा गोंधळही घातला होता. नंतर याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं.
पालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेले विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच राहणार की भाजपकडे जाणार याबाबतचा निकाल न्यायालय देणार असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागल्या होत्या. आज भाजपचा दावा फेटाळत मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केला.
Read Also :
जम्बो रुग्णालयातील आवश्यक सुविधांचे काम सात दिवसात पूर्ण करा – राजेश टोपे