नवी दिल्ली : महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे 71 व्या वर्षी निधन झाले. पटेल यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. बुधवारी पहाटे गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिग्विजय सिंह य़ांनी शोक व्यक्त केला आहे.
सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिलेले अहमद पटेल, सोनिया गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाच्या कोषाध्यक्षाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी ट्विट करून अहमद पटेलांना श्रद्धांजली वाहिलीय.