सोलापुर : भाजपचे सोलापुरचे जिल्ह्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या सोलापुर जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तात्काळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला. त्यानंतर त्यांच्याजागी सोलापुर ग्रामीण जिल्ह्याध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार शहाराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.
श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी जिल्ह्याध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली होती. मात्र आता त्यांना वादग्रस्त व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांना तात्काळ राजीनामा देण्याचा आदेश पक्षाकडून देण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एका महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. श्रीकांत देशमुख यांनी माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवलं असल्याचं त्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
श्रीकांत देशमुख यांनी त्याच्या बायकोसोबत संंबंध ठेऊन माझ्याशी शारीरीक संबंध ठेवले आहेत. तसेच तो माझ्याशी लग्न करणार असल्याचं त्या महिलेने म्हटलं आहे. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी त्या महिलेचा कॅमेरा हिसकावा असल्याचं त्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.