मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ आणि सुरु असलेली लॉकडाऊन चर्चा, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नसला, तरी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला. तसचं विविध राजकीय पक्षांशी आणि तज्ञांशी येत्या दोन दिवसांत चर्चा करून राज्यात आणखीन कडक निर्बंध लावणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच घरात त्यांच्या मुलाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यानां करोना झाल्याने त्यांना क्वारंटाईन केले गेले आहे. तर हातात दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.
वर्षा राऊत यांना गेल्या दोन दिवसांपासून करोना सदृश लक्षणं दिसत होती. यानंतर त्यांनी करोनाची चाचणी करून घेतली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पत्नीला करोनाची लागण झाल्यामुळे संजय राऊत यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. वर्षा राऊत यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप, सर्दी आणि खोकला होता. त्यामुळे त्यांनी करोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.