देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणावर वाढताना दिसत आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर आत क्रोणाने पुन्हा एकदा मातोश्रीवर धाड टाकली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
रश्मी ठाकरे यांचा हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. दोन दिवसांपूर्वी या सुरक्षारक्षकाची कोविड 19 चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी दुहावं ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांची तब्येत आता बरी असल्याचीही माहिती मिळत आहे. या दोन्ही सुरक्षारक्षकांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे.