नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने सत्ता दिल्यास राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली होती. भाजपच्या या घोषणेने वाद निर्माण झाला होता. मात्र आता आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे.
केरळमध्ये कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचे, राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन जाहीर केले आहे. अशी घोषणा करणारे केरळ हे तिसरे राज्य ठरले आहे.
COVID vaccine will be provided free of cost in the state: Kerala CM Pinarayi Vijayan pic.twitter.com/MTQ2FyjEcp
— ANI (@ANI) December 12, 2020
केरळआधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी देखील लस आल्यावर राज्यातील नागरिकांना लस मोफत उपलब्ध केली जाणार असल्याचे म्हटले होते. मध्यप्रदेश सरकारकडून देखील ऑक्टोबरमध्ये अशाचप्रकारची घोषणा केली गेली होती.
खबरदारी घेतली नाही तर राज्याची अवस्था आणखी बिकट होईल. रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री विजयन यांनी केले आहे.