IMPIMP
athawale athawale

जोपर्यंत लोकांच्या मनातुन जात निघत नाही तोपर्यंत दलितांवर अत्याचार होत राहतील: आठवले

मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरण देशात प्रचंड गाजत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. महिलांच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक आणि महिला कार्यकर्ते सरकारवर करत आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. जोपर्यंत लोकांच्या मनातुन जात निघत नाही तोपर्यंत दलितांवर अत्याचार होत राहतील असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी हि भावना व्यक्त केली आहे.

 

उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरण देशात प्रचंड गाजत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. महिलांच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक आणि महिला कार्यकर्ते सरकारवर करत आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. त्यानंतर ते काल हाथरस गेले होते. तिचे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

दरम्यान काल प्रियांका गांधींवर पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनामुळे देशातील अनेक नेते सरकारवर टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे. हाथरस अत्याचार प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात या घटनेचा निषेध केला जात आहे.

 

Read Also :