IMPIMP
After Baramati, now the focus of Mahayutti on Pune Lok Sabha election, important meeting in Pune After Baramati, now the focus of Mahayutti on Pune Lok Sabha election, important meeting in Pune

विधानसभेत महायुतीसमोर धोक्याची घंटा..! अन्यथा, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची मोठी ताकद निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४८ मतदारसंघापैकी ३० जागा जिंकल्या तर महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या. आता आगामी काही महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पुढे असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा..“मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या,” अजितदादाच्या आमदाराची पत्राद्वारे मागणी 

राज्यात मागील काही वर्षात सुरूवातीला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली. याचा परिणाम म्हणून भाजपच्या लोकसभेत जागा कमी झाल्यात. अशातच आता लोकसभा निकालावरून राज्यात महाविकास आघाडीला विधानसभेत १५८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महायुतीला फक्त १२७ जागा मिळू शकतात. अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपच्या १०५ आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला ४२ मतदारसंघात लीड मिळालं आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या एकूण ४० आमदारांच्या मतदारसंघात १४ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळालं आहे. यातच अजित पवार गटातील ४० आमदारांच्या मतदारसंघातील २५ मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळालं आहे. याचा अर्थ असा आहे की, एकूण ८४ मतदारसंघात महाविकास आघाडीला महायुतीचे आमदार असलेल्या मतदारसंघातून लीड मिळालं आहे.

हेही वाचा…“राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या”, सदाभाऊंची मोठी मागणी 

राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून बहुमतासाठी फक्त १४४ जागांची आवश्यकता आहे. मागच्या निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त १०५ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सरासरी ४० जागा मिळाल्या. अशातच लोकसभेत महाविकास आघाडीने एकजुट लढत ४८ पैकी ३० जागा ताब्यात घेतल्या. आता विधानसभेला देखील महाविकास आघाडी सोबत लढली तर १५० जागांपेक्षा अधिक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  त्यामुळे सध्या याची जास्त चर्चा सुरू झाली आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“उद्या मी आयोध्येला गेलो तर रामाचा सन्मान ठेवीन, परंतु मोदींनी…”,शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं 

हेही वाचा..“हा भटकता आत्मा तुम्हाला आता सोडणार नाही”, शरद पवारांनी मोदींना पुन्हा डिवचलं 

हेही वाचा…“नाशकात कांद्याने आम्हाला रडवलं,” मोदींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी कबुली 

हेही वाचा…“शरद पवार तुम्ही काँग्रेसच्या कुबड्यांवर आयुष्यभर राजकारण केल” 

हेही वाचा…“तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होत आणि नेहमी राहील”, रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट