नकुल नाडकर्णी
सिंधुदुर्ग: एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पीटल आणि मेडीकल कॉलेजचे उद्घाटन 6 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून दिली. यावेळी आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.
या वेळी बोलताना राणे पुढे म्हणाले कि ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वा. ५० मिनीटांनी अमित शहा यांचे आगमन मेडीकल कॉलेजच्या ठिकाणी होणार आहे. दुपारी १ वा.१० मिनीटांनी मेडीकल कॉलेजचे उद्घाटन होणारअसून त्यानंतर हॉस्पीटलच्या सभागृहात कॉलेज उद्घाटनचा समारंभ होणार आहे. कुडाळ तालुक्यातील पडवे येथे नारायण राणे यांचे लाईफ टाईम हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन यापुर्वीच झाले होते. आता मेडीकल कॉलेजलाही मान्यता मिळाली असुन यावर्षीपासुन हे कॉलेज सुरु होत आहे. या कॉलेजचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पीटलच्या माध्यमातुन देशातील सर्वोत्क्रुष्ट अशी आरोग्य सेवा जिल्ह्यातील जनतेला मिळु लागली असून अवघड अशा शस्त्रक्रिया या हॉस्पीटलमध्ये कमीत कमी खर्चात आहेत, या कॉलेजच्या माध्यमातून कोकणातूनही नवीन डॉक्टर साकार करण्याचे ध्येय साधणार आहोत.
लाईफ टाईम मेडीकल कॉलेजला १५० विद्यार्थ्यांची ऍडमिशन क्षमता लाभली असुन या १५० ही जागांवर १०० टक्के ऍडमिशन झाली आहेत. त्यामुळे आता या हॉस्पीटलचे उद्घाटन ६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरीषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, आशिष शेलार यांसह भाजपचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले आहे.