IMPIMP
Delhi has made you a goat, if you dare, kick it to the side Delhi has made you a goat, if you dare, kick it to the side

“दिल्लीने तुमचा बकरा केला, हिम्मत असेल तर लाथ मारून बाजुला व्हा”

कोल्हापुर : राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासुन शिवसेना व महाविकास आघाडीतील नेते सरकारवर टिकास्त्र सोडत आहेत. यातच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर टिका केली आहे. एकनाथ शिंदे तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्कारली. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.  सत्तेसाठी लाचारी किती असते, हे तुम्हीच दाखवुन दिलं अशा शब्दात विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.

“एखादा चित्रपट निघू शकतो”; शिंदेंच्या वक्तव्यानंतर “मी पुन्हा येईन” ची आठवण 

देवेंद्र फडणवीस तुम्ही बहुरूपी आहात. हे दिल्लीने दाखवुन दिलं. दिल्लीने तुमचा बकरा केला. तुमचा अपमान आम्हाला सहन होत नाही. हिम्मत असेल तर लाथ मारून बाजुला व्हा, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीसांना दिला. शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल ते म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कोणाच्याही दबावात न येता हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये भाजपचा कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि आम्ही भाजपशी जवळीक साधणार नाही. या सोबतच केसरकर हे आता पोपटपंची करु लागलेत अशी टीका राऊत यांनी केसरकर यांच्यावर केली.

“तुम्हाला काळजी असती तर देशमुख तुरूंगात गेले नसते”; सुप्रिया सुळेंना भाजपने डिवचलं 

राऊत पुढे म्हणाले की, आज इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित राहिलेत याचा आनंद आहे. नकली ते नकली असतात. व्यासपीठावर चोवीस कॅरेट सोनं आहे. गेले त्यांचा आता उल्लेख नको. दीपक केसरकरांनी शरद पवारांचा उपमान केला. त्याचा मी निषेद करतो. दोनवेळा आमदारकी दिली तिसऱ्यांदा उमेदवारी दिली.  अशावेळी शिवसेना महत्वाची नाही असं म्हणत आहेत. तुमच्या कपाळावर गद्दार हा शिक्का बसला आहे. अंबाबाईच्या कोर्टात तुम्हाला माफी नाही. काम होईपर्यंत हा माणुस पाया पडतो नंतर पाय देखील ओडतो. चंद्रकांत दादा तुम्ही सावध राहा, असंही विनायक राऊत म्हणाले.

“बिचारे मुख्यमंत्री..! त्यांची मला खुप काळजी वाटते” 

दरम्यान,  त्यावेळी शरद पवारांनी माझा राजीनामा स्विकारला नाही. पण ज्यावेळी ते सिंधुदुर्गमध्ये आले, त्यावेळी राष्ट्रवादीची मोठी सभा होती. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मी एकमेव आमदार त्याठिकाणी उपस्थित होतो. तसेच तिथे आव्हाड त्यांच्यासोबत होते. त्यांनी मला स्टेजवर येूऊ नका, असा निरोप दिला. त्यानंतर राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही चुकुन घडले असेल तर पवारांची दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही आवश्यकता असेल तर त्यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेने असंही केसरकर म्हणाले.

Read also