IMPIMP

  मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्ष ढोंगबाजी करत आहेत ;फडणवीसांचा आरोप    

 भंडारा : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील मुंबईत एकवटले आहेत. मात्र हा मोर्चा शेतकऱ्यांचा नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात देखील शेतकरी नसल्याचा दावा भाजप नेत्यांकडून सतत करण्यात येत आहे. त्यात आता फडणवीसांची भर पडली आहे.मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्ष आदिवासींची दिशाभूल करुन केवळ ढोंगबाजी करत आहेत असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भंडाऱ्यातील रुग्णालयालयात नवजात बालकांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेचा निषेध केला. हा अपघात नसून शासकीय यंत्रणांच्या निष्काळजीपणातून झालेले खून असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील भूमिकेवर कडाडून टीका केली. पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनाची कधी चौकशी केली का ? पंजाबचा शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा शेतकरी आहे का ? केंद्र सरकारने कोणालाही विश्वास न घेता कायदे पास केल्याचे पवार यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदींनी कायदा आणताना सविस्तर चर्चा केली पाहिजे होती. पण ती झाली नाही. शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही कृषी कायदे उद्धवस्त झाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

Read Also

राज भावनाकडे निघालेल्या आंदोलकांना अडवले ,पोलिसांसोबत झटापट

कुणाची किती लग्न न त्यांना किती पोर सांगू का ?