देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ म्हणत टोला लगावला आहे
“नया है वह! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवत आहेत. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. त्यामुळे ठिक आहे. ते नवीन आहेत, बोलत आहेत. मला असं वाटतं, माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काही प्रतिक्रियादेखील देऊ नये”, अशी टीप्पणी फडणवीसांनी केली.
“कोरोना संकटात विरोधी पक्षाचे नेते सर्वसामान्यांना मदत करण्याऐवजी हेल्थ टूरिज्म किंवा डिझॅस्टर टूरिज्म म्हणून फिरत आहेत. मात्र, आम्ही तसं करत नाही. आम्ही लोकांची मदत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करत आहोत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती