नगर : दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी काल शरद पवारांनी नगरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेतून शरद पवारांनी भाजपसह राज्यातील सत्ताधारी पक्षावर जोरदार टिका केली. तर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरून डिवचलं होतं. त्यावरूनही शरद पवारांनी सुजय विखे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला.
हेही वाचा…“जिल्ह्याला लागलेली दृष्ट कशी दुर करायची ते माहितीय”, विश्वजीत कदमांनी दिला कडक इशारा
शरद पवार म्हणाले की, संसदेत १८ भाषांचं अनुवादक असतात. ते आपल्याला सर्व भाषा समजून सांगतात. कर्नाटकचा माणुस असो, तामिळनाडूचा असो किंवा काश्मिरचा माणूस असो. त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं आणि मंत्र्यांना प्रधानमंत्री यांना सुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळे मी इंग्रजी बोलतो त्यामुळे मीफार शहाणा झालो, असं सांगायचं काही कारण नाही. ते तुमचं इंग्रजी तुमचं तुम्हाला लखलाभ. असं म्हणत शरद पवारांनी सुजय विखे पाटलांना चांगलचं फटकारलं.
हेही वाचा…“मोदींनी किती मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली”, ? राऊतांचा भाजपचा खोचक सवाल
आम्हाला इथं फाटका माणूस, फाटक्या समाजाच्या हिताची जपणूक करणारा आणि मराठीमध्ये आणि आमच्या गावरान मराठीमध्ये बोलणारा माणूस त्याठिकाणी हवा आहे. अन् तो निलेशच्या रूपाने आम्हाला मिळाला आहे. त्यांना मोठ्या मतांनी विजयी करा. त्यांची खूण तुतारी वाजवणारा माणूस, त्याच्यातही घोटाळा केला आहे हे लक्षात ठेवा. हे लोक घोटाळे करण्यामध्ये फार हुशार आहे. त्यांनी आणखी एक माणूस बीडचा उभा केला. त्याला नुसतीच तुतारी दिली. माणूस नाही नुसतीच तुतारी. त्यामुळे आपल्या तुतारीची आवाज दिल्लीत पोहोचणार नाही. दिल्लीला आवाज पोहोचवायचा असेल तर ती तुतारी फुंकायला पाहिजे, त्यासाठी माणूस पाहिजे आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हे खूण निलेश लंके यांची आहे. असेही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…‘मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाची औपचारिकता बाकी’, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
हेही वाचा…“बारामती जिंकून आणा, भाजपचाच दादांना आदेश”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांची भेट, अन् विनोद पाटलांची संभाजीनगरमधून माघार, काय घडतंय ?
हेही वाचा..म्हणून आज अमरावतीकरांना बळवंत भाऊंची गरज “, यशोमती ठाकुरांनी विरोधकांवर डागलं टिकास्त्र