पुणे : कॉंग्रेसने ज्या योजना आणल्या त्यातून त्यांची धोरणं जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना सगळी मदत करणं आहे. जे घुसखोर आहेत. त्यांना कॉंग्रेसची मदत होत आहे. मी माता भगिनींना सांगू इच्छितो की यांचा अर्बन नक्षलवादाचा विचार हा तुमच्या गळ्यात तुमचं मंगळसुत्रही ठेवणार नाही. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
खरं तर कॉंग्रेसच्या काळात नाही तर भाजप, मोदींच्या काळात बायकांची मंगळसुत्र गहाण पडत आहेत, लुटली जात आहेत. देशांमध्ये जो माणूस स्वत: च्या घरातल्या मंगळसुत्राला प्रतिष्ठान देऊ शकला नाही. त्याने दुसऱ्याच्या मंगळसुत्रांची उठाठेव करू नये. या देशामध्ये या देशातल्या महिलांचे मंगळसुत्र ही मोदींच्या काळात विकली गेली असल्याचे म्हणत राऊतांनी मोदींवर घणाघात केलाय.
पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी जी नोटबंदी आणली होती. त्या नोटबंदीमुळे लाखो महिलांना आपलं मंगळसुत्र गहान ठेऊन घर चालावावं लागलं. नरेंद्र मोदी यांनी जे लॉकडाऊन केलं होतं. त्यात हजारोंच्या संख्याने रोजगार गेला. त्या काळामध्ये या देशातल्या लाखो महिलांना आपलं मंगळसुत्र विकून घर चालवावा लागला. या देशातल्या बेरोजगार तुरूणांच्या मातांना मंगळसुत्र गहाण ठेऊन शिक्षणासाठी पैसे द्यावे लागले. मणिपुमध्ये किती महिलांचे मंगळसुत्र गेलं. त्याला जबाबदार मोदी आहेत. मोदींनी किती मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली. याचं उत्तर त्याने द्यावे. असेही राऊत म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“नजरचुकीने खासदार झालेल्यांना आता थारा नाही”, दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
हेही वाचा…“समाजासाठी चंदणाप्रमाने झिजले, त्या कार्याचा सुगंध आजही दरवळतोय,” सुनेत्रा पवार
हेही वाचा…“कोल्हेंनी राऊतांसारखी सकाळी उठून बडबड करू नये”, कोल्हेंच्या टिकेला आढळरावांचा पलटवार