दौंड : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दौंड तालुक्याचा दौरा केला. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच त्यांनी दौंड तालुक्यात संयुक्त दौरा केला. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख नेते एकवटल्याचे चित्र दिसून आले. तालुक्यातील खडकी येथून पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा…“मासा जसा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो, तसा..,” सुनील तटकरेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला. तर महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कार्यकत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल, यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन राहूल कुल यांनी मतदारांना केले.
हेही वाचा…धाराशिवमध्ये ३१ उमेदवार रिंगणात, १ लाख ६ हजार ४९९ नवमतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार ?
देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. विकासाला महत्त्व देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत असताना आपणही त्यात मतदान करून सामील व्हावे आणि विकासरथात हातभार लावावा, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी मतदारांना केले.
दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार दौंड तालुका दौऱ्यावर असताना हातवळण गावात गेल्या असता तेथील स्थानिक महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील असा विश्वास दिला. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“समाजासाठी चंदणाप्रमाने झिजले, त्या कार्याचा सुगंध आजही दरवळतोय,” सुनेत्रा पवार
हेही वाचा…“कोल्हेंनी राऊतांसारखी सकाळी उठून बडबड करू नये”, कोल्हेंच्या टिकेला आढळरावांचा पलटवार
हेही वाचा…शरद पवार गटाने जाहीर केला आपला जाहीरनामा, जाहिरनाम्यात कोणत्या गोष्टी ? वाचा संपुर्ण यादी