नाशिक : गेल्या अनेक दिवसापासून नाशिकच्या जागेवरून महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला आहे. यातच मंत्री छगन भुजबळांनी माघार घेतली तरी अद्यापही नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाहीय. यातच नाशिकमधून निवडणुक लढवली असती निवडून आलोच असतो असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच प्रतीम मुंडे यांना नाशिकमधून उभं करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यावरही मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…अर्चना पाटलांसाठी मोदींची धाराशिवमध्ये सभा, ‘या’ दिवशी राजकारण तापणार
काल बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी महायुतीची मोठी सभा बीडमध्ये पार पडली. या सभेत बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, याच्यापुढे माझ्यासाठी किंवा माझ्या परिवाराला लोकसभेसाठी मत मागणार नाही. हा पंकजा मुंडे यांचा जाहीर शब्द आहे. प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही. हा मी शब्द दिला होता. मला नका देऊ. नका देऊ. हा शब्द घेऊनच मी सगळीकडे गेली होती. परंतु आता लक्षात आलं की ही निवडणूक कशासाठी आहे. ताईचं काही अडलं नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यांना नाशिकमधून उभं करेन, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“आता लबाडा घरचं आवतान जेवल्याशिवाय खरं नाही”, शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
प्रितम मुंडे यांना नाशिकमधून उभं करेन असं पकंजा मुंडे यांनी म्हटलंय. त्यावर छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडेंना बीडकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. बीडमध्ये १३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तिकडे त्यांनी त्यांनी पुर्ण प्रयत्न करायला हवे. नाशिकमध्ये उमदेवार नाहीत अशी काही अचडण नाही. तर नाशिकमध्ये खुप उमेदवार आहे, हीच खरी अडचण आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. कारण त्यांना तिथे कुठल्याही परिस्थितीत निवडून यायलं हवं. असा टोलाही मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडेंना लगावला.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील मला शिरूरमधून निवडणुक लढविण्यासाठी विचारणा केली होती. आता सगळीकडे भाषण करत असतो. त्यामुळे माझा संबंध सगळीकडे येतो. परंतु नाशिकमध्ये मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण मला नाशिकमधून उभं राहण्यासाठी विनंती करीत आहेत. कदाचित नाशिकमधून उभा राहिलो तर निवडून पण येईन असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाने जाहीर केला आपला जाहीरनामा, जाहिरनाम्यात कोणत्या गोष्टी ? वाचा संपुर्ण यादी
हेही वाचा…“मासा जसा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो, तसा..,” सुनील तटकरेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…धाराशिवमध्ये ३१ उमेदवार रिंगणात, १ लाख ६ हजार ४९९ नवमतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार ?
हेही वाचा…भरसभेत भोवळ आली, आराम करून नितीन गडकरी पुन्हा भाषणासाठी व्यासपीठावर