यवतमाळ : संपुर्ण राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा सुरू झाला आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून उन्हाचा प्रचंड कडाका असतांनाही राजकीय नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतांना दिसत आहेत. यातच काही दिवसापुर्वी ठाकरे गटातील आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली होती. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एका जाहीर कार्यक्रमात भोवळ आल्याची मोठी घटना घडली आहे.
“देवेंद्र फडणवीस हा एकच बाप, जो शरद पवारांना पुरून उरला”, कुणी केला घणाघात ?
यवतमाळ-वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी यवतमाळ येथील पुसद येथे महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नितीन गडकरी यांनी देखील भाषण केलं. मात्र भाषणादरम्यानच गडकरी यांना भोवळ आल्याने कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. तर यावेळी नितीन गडकरी यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना लगेचच पकडलं.
हेही वाचा…“परभणीमध्ये चमत्कार घडणार अन् महादेव जानकर दिल्लीत जाणार”, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
नितीन गडकरी यांना भोवळ आल्यानंतर लगेच त्यांना सुरक्षा रक्षकांनी पकडलं अन् त्यांना खुर्चीवर बसवलं. त्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आलं. तर ग्रीनरूमध्ये त्यांना बसवण्यात आल्यानंतर त्यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. यातच थोडा वेळ आराम केल्यानंतर नितीन गडकरी पुन्हा भाषणासाठी समोर आले. त्यानंतर महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निश्वास सोडला.
READ ALSO :
हेही वाचा…अर्चना पाटलांसाठी मोदींची धाराशिवमध्ये सभा, ‘या’ दिवशी राजकारण तापणार
हेही वाचा…“आता लबाडा घरचं आवतान जेवल्याशिवाय खरं नाही”, शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…अन् नितीन गडकरींना भरसभेत आली भोवळ, नेमकं काय झालं ? प्रकृती कशी ?
हेही वाचा…आढळराव पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीकडून पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन
हेही वाचा..“…पण तुम्हाला पवारसाहेबांची आठवण आलीय”, तटकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल