परभणी : महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल जाहीर सभा पार पडली. त्याआधी मुख्यमंत्र्यांसह महादेव जानकर यांनी पाथरी येथील श्री साईबाबांच्या मंदिरास भेट देत मनोभावे पुजन करीत भक्तीभावाने दर्शन घेतले. यानंतर प्रचार रॅलीत एकनाथ शिंदेंनी सहभाग घेतला. तर जाहीर सभेतून शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…“तानाशाही करणाऱ्यांच्या अहंकाराचे हनुमान जयंती दिवशीच दहन झाले”
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एका सर्वसामान्य शिवसैनिक, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने काहींच्या पोटात पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळेच ते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. शिव्या देत आहेत. पण हा शिवीगाळ मलाच नव्हे तर राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मराठा आणि बहुजनांनाही आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले, त्यांच्यावर योग्य संस्कार मात्र झालेले नाहीत. अशांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिलाय.
काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून वापरले आणि त्यांना गरिबीत ठेवले, मात्र मोदीजींनी मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास केला. बारामतीत साडेतीन लाखांचा लीड ३४ हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता. मात्र आता ते परभणीत इतिहास घडविणार आहेत. परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर नक्की दिल्लीत खासदार म्हणून बहुमताने विजयी होऊन जातील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. महादेव जानकार यांना १७ भाषा येतात. खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर विकास आणि प्रगतीची भाषाही ते शिकतील आणि परभणीच्या विकासासाठी आकाश पाताळ एक करतील असे शिंदेंनी सांगितले.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, सरकारने मौलाना आझाद महामंडळाचा निधी ५० कोटींवरुन ५०० कोटींपर्यंत वाढवला आहे. सरकारने सर्वच समाज्याला न्याय देण्याचे काम केले. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ते मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, असे सरकारचे उद्दिष्ट आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मुस्लिम समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…अन् तटकरे जुन्या आठवणी सांगत क्षणभर गहिवरले, सांगितला ‘तो’ जुना किस्सा
हेही वाचा…मोठी बातमी…! शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चीट
हेही वाचा…‘लाव रे तो व्हिडिओ, दाखवत मल्हार पाटलांनी विरोधकांचा भांडाफोड केला, एकच चर्चा