पुणे : लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी जाहीर केलेली आहे. आज आढळराव पाटील यांना हे उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी अशा दिग्गजांची उपस्थिती होती.
हेही वाचा…शरद पवार गटाने जाहीर केला आपला जाहीरनामा, जाहिरनाम्यात कोणत्या गोष्टी ? वाचा संपुर्ण यादी
गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे लांडेवाडी येथील निवासस्थानी कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सर्व ग्रामदेवत श्री भैरवनाथ मंदिर, मारोती आणि विठ्ठल रुख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन करून त्यांचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, रामदास आठवले, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन या मुख्य पदयात्रेला सुरुवात केली.
हेही वाचा…“मासा जसा पाण्याबाहेर पडल्यावर तडफडतो, तसा..,” सुनील तटकरेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले. शिरुर लोकसभा मतदारसंघाकडून शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे लोकसभा मतदारसंघाकडून मुरलीधर मोहोळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाकडून सुनेत्राताई पवार महायुतीकडून रिंगणात उतरले आहे. पुण्यातील निवडणूक तिरंगी होणार असून त्याची उत्सुकता राज्यभरात आहे.
यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे, जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल बेनके, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते पाटील, हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे यांच्यासह इरफान सय्यद, प्रदीप कंद, आशा बुचके, मंगलदास बांदल, आणि महायुतीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“समाजासाठी चंदणाप्रमाने झिजले, त्या कार्याचा सुगंध आजही दरवळतोय,” सुनेत्रा पवार
हेही वाचा…“कोल्हेंनी राऊतांसारखी सकाळी उठून बडबड करू नये”, कोल्हेंच्या टिकेला आढळरावांचा पलटवार