पुणे : संपुर्ण देशात बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. याठिकाणी पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा राजकीय सामना होत असून महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार चांगलेच कामाला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. यातच बारामतीची जागा जिंकण्यासाठी अजित पवारांना दिल्लीतून आदेश दिल्याची माहिती शरद पवारांनी आज दिली.
शरद पवार म्हणाले की, अमित शाह यांच्यासह भाजपच्या लोकांचं लक्ष बारामतीत आहे असं दिसतंय. परंतु अजित पवारांनी बारामतीमतून सुनेत्रा पवारांना उभं करा असं मी सांगितलं नाही. यातच दिल्तीतून अजित पवारांनी सुचना दिल्या होत्या की, बारामतीतून ही जागा तुम्ही जिंकून आणली पाहिजे. तसेच प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यावेळी बारामतीत होतो. त्यानंतर सध्या महाराष्ट्राच फिरत आहे. असेही शरद पवारांनी सांगितलं.
हेही वाचा…“नजरचुकीने खासदार झालेल्यांना आता थारा नाही”, दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
पुण्यात पवार विरूद्ध पवार अशी लढत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, देशात लोकशाही असल्याने त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यांनी आता निर्णय घेतला आहे. त्यांची इच्छा आहे तशी, त्या गोष्टीला मला आनंद आहे. असं म्हणत शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या बारामतीत पवारांचा पराभव करायचा आहे. या विधानावर उत्तर दिलंय. पण मी स्वत : उमेदवार नाही आहे. असेही ते म्हणाले.
दरम्यान, तुम्ही नरेंद्र मोदी यांची एक क्लिप ऐकवली होती. त्यामुळे देशात एक चित्र आहे की ही लढाई पवार विरूद्ध मोदी अशी आहे. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी अलिकडच्या काळात अल्पसंख्यांकाबाबत भाषणं केली होती. पंतप्रधान हा पक्षाचा नसून तो देशाचा आहे. जनतेची त्यांच्याकडे सामाजिक जबाबदारी आहे. त्यांची वेगळी भूमिका ऐतिहासिक गोष्टीला धक्का लावणारी असते. त्यामुळे ही गोष्ट मला आवडली नाही. त्यामुळे ती क्लिप ऐकवली. असेही शरद पवारांनी म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांची भेट, अन् विनोद पाटलांची संभाजीनगरमधून माघार, काय घडतंय ?
हेही वाचा..म्हणून आज अमरावतीकरांना बळवंत भाऊंची गरज “, यशोमती ठाकुरांनी विरोधकांवर डागलं टिकास्त्र
हेही वाचा…“जिल्ह्याला लागलेली दृष्ट कशी दुर करायची ते माहितीय”, विश्वजीत कदमांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“मोदींनी किती मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली”, ? राऊतांचा भाजपचा खोचक सवाल