भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, “भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं
देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पुढच्या काही महिन्यांमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाकडून फडणवीस यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे.
दरम्यान, सध्या बिहार सरकारकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर निशाणा साधला जात आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी रोखठोक भूमिका मांडली