पटना : बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. या पार्शवभूमीवर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर गुप्तेश्वर पांडे राजीनामा देतील. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चर्चेत असणारे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेताच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. समाजवादी पक्षाने ट्वीट केले आहे की, समाजवादी पार्टी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती करणार नसून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देईल.
बिहारमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, रविवारी भाजपने आपला जाहीरनामा तयार करण्याबाबत जनमत आणि सूचना मिळवण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला एक ‘रथ’ रवाना केला होता. त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील मतदारांची मतं जाणून घेतली.
Read Also :