नवी दिल्ली : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.
‘अमेरिकेप्रमाणे भारतालाही जो बायडन यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. तो नेता जरी विशिष्ट पक्षाशी संबंधित असला तरीदेखील भारत आणि भारतीयत्व त्याच्यासाठी अधिक महत्वाचं असेल. देशात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना हरवून त्याने देशातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावा आणि 2024 मध्ये निश्चितपणे असा नेता भारताला लाभेल’, असा आशावाद दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
Now we need a Joe Biden in India too!! Let’s hope we get one in 2024. It should be the effort of every Indian irrespective of party affiliation. The Divisive Forces in India have to be defeated. We are Indians First!!
2/2
#IndiaFirst#UnityInDiversity— digvijaya singh (@digvijaya_28) November 8, 2020