अॅपलने काही महिन्यांपूर्वी भारतात आपला ‘स्वस्त’ iPhone SE 2020 लाँच केला. हा नवीन आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सध्या Apple Days सेल सुरू आहे. या सेलमध्ये अॅपलच्या ‘स्वस्त’ iPhone SE 2020 फोनवर आकर्षक डिस्काउंट मिळेल. पण, आज (दि.29) या सेलचा अखेरचा दिवस आहे.
फ्लिपकार्टवर iPhone SE ची (64GB) किंमत 40 हजार 999 रुपये आहे. मात्र, अॅपल डेज सेलमध्ये हा फोन 37 हजार399 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. म्हणजे या फोनवर 3 हजार 600 रुपये डिस्काउंट मिळत आहे. पण, या डिस्काउंटचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे फोन खरेदी करावा लागेल. एचडीएफसी क्रेडिट कार्डने ईएमआयवर फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल.
या ऑफरव्यतिरिक्त सेलमध्ये या फोनवर 14,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंटचीही ऑफर आहे. याशिवाय फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर पाच टक्के कॅशबॅक मिळेल. तर, सेलमध्ये एचडीएफसी डेबिट कार्डवरही 1500 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटची ऑफर आहे. सेलमध्ये आयफोन SE च्या तिन्ही व्हेरिअंटवर डिस्काउंटची ऑफर आहे. म्हणजे 64GB व्हेरिअंट, 128GB व्हेरिअंट आणि 256GB व्हेरिअंटच्या खरेदीवर या ऑफरचा फायदा घेता येईल.