म्हापसा : संपूर्ण जगाने कोविड-१९ महामारीची भयंकरता अनुभवली आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात- कुटुंबातील एकतरी व्यक्ती या रोगाने बाधित झाली आहे. कोविडची पहिली लाट, लॉकडॉउन त्यानंतर दुसरी लाट आणि आता तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आपण आहोत. कुणी आपली आई गमावली आहे, तर कुणी वडील, कुणी भाउ, कुणी बहीण, तर कुणी आपल्या मुलाला गमावले आहे. कुणी आपला नातेवाईक, कुणी शेजारी या महामारीत मृत्यूमुखी पडलेला पाहिला आहे. त्यामुळे, महामारीचे भांडवल करू नका, असे आवाहन म्हापसाचे भाजपा उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.
डिसोझा म्हणाले, या कोविड महामारीच्या काळात आपण सर्वजण संकटात होतो. प्रत्येकाने आपआपल्या परीने लोकांना मदत करण्यासाठी पुढकार घेतला आहे. आता गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने सर्वपक्षीय उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार यात शंका नाही. पण, कोविड महामारीचे राजकीय भांडवल करु नये, अशी माझी ठाम भूमिका आहे.
“इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीच अनुभवलं नाही”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
कोविड ही एक जागतिक आपत्ती होती. या आपत्तीचे भाडवल करणे, मानवतेला काळींमा फासण्यासारखे आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते-पदाधिकारी यांना आवाहन करतो की, निवडणूक प्रचारासाठी कोविडसारख्या महामारीचा आधार घेवून मानवतेची चेष्टा करू नये, असही ते म्हणाले.
Read also:
- भाजप- शिवसेनेत जुंपली; राऊतांच्या ट्विटवर पुनम महाजन म्हणतात… नामर्दासारखे कार्टुन…
- औरंगाबादमध्ये आले तर नाना पटोलेंना कपडे फाटेपर्यंत मारू; शहर भाजपचा पटोलेंना सज्जड दम
- नवख्या जोशुआने कोरोना काळात केलेल्या कामांचं म्हापसेकरांकडून तोंडभरून कौतुक !
- शरद पवारांना कोरोनाची लागण: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लगेच फोन, केली तबेतीची विचारपूस
- नाना पटोलेंच्या फोटोला भाजपने पाजलं गोमूत्र; प्रसाद लाड म्हणतात… नानांच शुद्धीकरण करणं गरजेचं…