मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. दादर येथे नाना पटोले यांच्या विरोधात भाजप नेते प्रसाद लाड यांनी आंदोलन केलं. नाना पटोले यांच्या विरोधात भाजपने ‘गोमूत्र पाज’ आंदोलन केलं. यावेळी नाना पटोले यांच्या फोटोला भाजपने गोमूत्र पाजलं आहे.
लोबोंनी गोव्यातील भंडारी समाजाला संपवण्याची सुपारी दिली; कांदोळकरांचा घणाघात
राहुल गांधी यांच्या चमच्याचा निषेध करणाऱ्यांचा आम्ही निषेध करत आहोत. ज्यांनी पंतप्रधान यांचा अपमान केला, त्याच्या प्रतिमेला आम्ही गोमूत्र पाजत आहोत आणि शुद्ध करत आहोत. आज आम्ही नानांना पवित्र करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आमच्या कार्यकर्ते यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, अस प्रसाद लाड म्हणाले.
हे तर भाजपाबद्दलची मळमळ, जळजळ व्यक्त करणार दिशाहीन असं पकाऊ भाषण!
आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत. नाना पटोले या गुन्हेगारावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. नाना पटोले याची लायकी देखील नाही. गावगुंड स्वतःच नानाला शिव्या देतो, असं म्हणत प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंवर ताशेरे ओढले.
देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या व बुरसटलेल्या विचारांच्या @NANA_PATOLE यांचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे… तरच त्यांचा हर्बल नशा उतरेल…@BJP4Maharashtra pic.twitter.com/1ztXuURYrN
— Prasad Lad (@PrasadLadInd) January 24, 2022
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ परत एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करून त्यांनी परत एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. नाना पटोले यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली होती. मात्र, जाता-जाता परत एकदा त्यांनीच आपल्याच वादग्रस्त वक्तव्याचा वाद क्षणाचा देखील वाट न बघता, त्यात परत एकदा एक काडी टाकली आहे.
Read also:
- “इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीच अनुभवलं नाही”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
- बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता? देवेंद्र फडणवीस संतापले
- नागपूरात स्टेजवर न्यूड डान्स, आर आर आबांच्या स्वप्नांना ठाकरे सरकारकडून तिलांजली – चित्रा वाघ
- “बेटी बचाओ बेटी पटाओ” म्हणणाऱ्याचे पुतळे जाळणार का? नाना पटोलेंचा भाजपला रोखठोक सवाल
- भाजपाने ज्या-ज्या पक्षांसोबत हातमिळवणी केली, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला – नवाब मलिक