मुंबई : डान्स हंगामा कार्यक्रमाच्या नावाखाली स्टेजवर प्रेक्षकांच्या समोरच अत्यंत अश्लील कृत्य केली जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरला झाला आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या सगळ्या प्रकारावरून महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे स्वप्न होतं की डान्स बार बंद करून चुकीच्या मार्गानं जाणा-या तरूणाईला योग्य दिशा दाखवावी. पण आत्ता महाविकास आघाडीकडून आणि सत्तेतील राष्ट्रवादीकडून त्यांच्याच स्वप्नांना तिलांजली देण्याचा प्रकार नागपूर ग्रामीण भागांत घडला असल्याचं त्यांनी म्हंटले आहे.
ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं; नाना पटोलेंची जीभ पुन्हा घसरली
सरकारच्या नाकाखाली महिलांना नग्न अवस्थेत डान्स करायला लावला जातेय. ते ही उघडपणे. सरकारनं पोलिस यंत्रणेनं सर्व लाज शरम वेशीवर टांगलीय का ? असा प्रश उपस्थित करत त्यांनी सरकारसोबत पोलीस प्रशासनावर देखील टीका केली.
संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून काळजीवाहू विरोधकांना उत्तर देणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा एल्गार
सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी या गावातील असल्याचे सांगितले जात आहे. या भागातील काही गावांमध्ये डान्स हंगामाच्या नावाखाली अशा अश्लील नृत्यांचे कार्यक्रम सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. या गावामध्ये नुकताच हाच डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. पण या कार्यक्रमात डान्स हंगामाच्या नावावर अश्लीलतेचा कळस पाहायला मिळाला.
Read also:
- “बेटी बचाओ बेटी पटाओ” म्हणणाऱ्याचे पुतळे जाळणार का? नाना पटोलेंचा भाजपला रोखठोक सवाल
- भाजपाने ज्या-ज्या पक्षांसोबत हातमिळवणी केली, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला – नवाब मलिक
- पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
- हे तर भाजपाबद्दलची मळमळ, जळजळ व्यक्त करणार दिशाहीन असं पकाऊ भाषण!
- लोबोंनी गोव्यातील भंडारी समाजाला संपवण्याची सुपारी दिली; कांदोळकरांचा घणाघात