मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून शिंदे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वाद आता टोकाला पोहचला आहे. मुंबईत अनेक माजी नगरसेवकांना धमकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यातच आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची सुरक्षा काढून घेतल्याने राज्य सरकारवर कडाडून टिका होत आहे. याच संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.
“ठाकरेंना क्लीन बोल्ड करण्यासाठी शरद पवार अन् मोदी एकत्र येतील”; केंद्रीय मंत्र्याचं सुचक वक्तव्य
त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज मी मुंबईहून गावी जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसला गेलो. परंतु नेहमीप्रमाणे एकही पोलीस पुढे आला नाही. मात्र, मला पाहताच रेल्वे स्टेशन परिसरात असलेले अनेक कुली धावत आले आणि ‘आम्हाला माहिती आहे, तुमचे पोलीस संरक्षण सरकारने काढलेले आहे. पण तुम्ही चिंता करू नका तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची राहील’, असे म्हणत हे सर्वजण मला प्लॅटफॉर्मवर घेऊन जावू लागले. तितक्यात अचानकपणे एक व्यक्ती जोरात धावत आली. आपलं नाव बाळकृष्ण नाईक असल्याचे सांगत त्यांनी आपला शर्ट बटन तुटेपर्यंत खासकन ओढला आणि छाती उघडी करून दाखवली. त्या छातीवर हिंदुहृसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा गोंदवलेला फोटो होता.
त्यांनी सांगितलं, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमचं संरक्षण काढून घेतले. तुमच्या जीविताशी त्यांनी खेळण्याचं ठरवलं असलं तरी हे असे माझ्यासारखे बाळासाहेबांचे असंख्य शिवसैनिक तुम्ही जाल तिथे आपल्या जीवाची बाजी लावून तुमचे संरक्षण करतील. आम्हाला माहित आहे आज शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करीत आहात, हे काम तुम्ही असेच सुरू ठेवा. शिवसैनिकांना तुमचा खूप मोठा आधार वाटतो. स्टेशनवरचे कुली आणि नाईक यांचे उदगार ऐकताना माझे मन गहिवरून आले. मी केवळ त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि रेल्वेगाडीत बसलो. मात्र हे सर्व होत असताना नेहमी आदराने पुढे येणारे पोलीस खिन्न मनाने एका कोपऱ्यात बसून हे सर्व चित्र पाहत होते. त्यांच्या मनातील भावना मात्र मला समजत होत्या.
Read also
- “तर येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा दुष्काळ दिसेल”; राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर निशाणा
- “प्रत्येक जण गट स्थापन करतोय, माझा ही गट लवकरच दिसेल”; दिपाली सय्यद
- “राज ठाकरे, शिंदे अन् देवेंद्र फडणवीस एकत्र येणार”; तारिख अन् वेळ ही ठरली ?
- “राष्ट्रवादीविरोधात शिंदे-फडणवीसांची पुण्यात मोठी फिल्डिंग”; दोन्ही बांजूचे नेते एकवटले
- “उद्धव ठाकरे राजकारणी झाले नसते तर ते वकिल किंवा डॉक्टर झाले असते”; आदित्य ठाकरे