एड्स या रोगाच्या रुग्णांची संख्या जगभरात लाखात असून या रोगावर आतापर्यन्त नियंत्रण आणण्यास यश मिळाले नव्हते तसेच या रोगावरअद्यापही कोणतेही प्रतिबंधक औषधअथवा लस उपलब्धनसल्यामुळे मागील अनेक वर्षांमध्येलाखोंजणांनी एड्समुळे आपला जीवगमावला आहे. यातलहान मुलांची सर्वाधिकसंख्या आहे.मात्र आता पहिल्यांदाच एड्स या रोगाचे समूळ नाश करणारे औषध सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ब्राझीलच्या एका एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीला या औषधांचे मिश्रण देण्यात आले. या मिश्रणामुळे एड्सपासून ही व्यक्ती मुक्त झाल्याचा दावा फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या संशोधकांनी केला आहे.
विद्यापीठाने म्हटले आहे की गोपनीयता कायद्यामुळे रुग्णाचे नाव जाहीर करता येत नाही, पण लवकरच या संदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) देण्यात येईल.संशोधकांच्या मते, अनेक अँटीरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटीनामाइड औषधांचे मिश्रण एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीला दिले गेले होते.
यासंदर्भात टाईम मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, एड्स-2020 नावाच्या ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये शास्त्रज्ञांच्या टीमने एड्स रूग्णाला बरे केल्याचा दावा करून जगाला चकित केले आहे . याबाबत माहिती देताना संशोधक डॉ. रिकार्डो डियाज यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2012 मध्ये ही ब्राझिलियन व्यक्ती एड्सग्रस्त आढळला होता. एड्सच्या उपचारा दरम्यान रुग्णाने देण्यात आलेली औषधे घेणे बंद केली होती. संशोधनादरम्यान, रुग्णाला दोन महिन्यांनी अँटीरेट्रोव्हायरल औषधे आणि निकोटिनामाइड औषधांचे मिश्रण दिले. जेव्हा एकी वर्षानंतर, रुग्णाची रक्त तपासणी केली गेली, तेव्हा त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
निरोगी रुग्णाने नवे आयुष्य मिळाल्याचे सांगितले. रुग्णाने सांगितले की, मी व्हायरस मुक्त झालो आहे, ही लाखो एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे ही पहिली घटना आहे की, स्टेम सेल प्रत्यारोपणाशिवाय एचआयव्ही बरा झाला. यापूर्वी स्टेम सेल प्रत्यारोपणाने लंडनमधील एक व्यक्ती निरोगी झाला होता. संशोधक अॅडम कॅस्टालिजाच्या मते, रुग्ण जिवंत आणि व्हायरस मुक्त आहे. हे संशोधन असे सिद्ध करते की एड्सवर उपचार केले जाऊ शकतात.
HIVची एखाद्या व्यक्तीला लागण झाल्यावर व्हायरसला शरीरातून बाहेर काढणे फार कठीण आहे. कारण ते रक्तपेशींमध्ये घर बनवतात आणि बराच काळ शरीरात राहतात. जर रुग्णाने औषधे घेणे बंद केले तर व्हायरस सक्रिय होतो. दुसरीकडे, कॅलिफोर्निया विद्यापीठातील एड्स विशेषज्ञ डॉ. मोनिका गांधी यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व प्राथमिक स्तरावर आहे. कारण केवळ एक व्यक्ती बरा झाला आहे. याबद्दल आता अधिक संशोधन करण्याची गरज आहे.