पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं होतं. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महापौराना ताप आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवरुन माहिती दिली होती
माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेन. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असंही मोहोळ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 4, 2020
मोहोळ यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आणखी आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.