लातूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर लातूरमधील एका तरुणाने हताश होऊन विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला होता. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर करण्याचा निर्णयही दिला होता.
मात्र त्यानंतर मराठा समाजात या निर्णयाबाबत संतापाची लाट पसरलेली पहायला मिळाली होती. त्यामुळेच हताश झालेल्या लातूरच्या किशोर कदम या तरुणाने थेट विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. किशोर हा सध्या एमपीएसीच्या परीक्षेसाठी तयारी करत होता. मात्र आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे निराश झालेल्या किशोरने चाकूर येथील तहसील कार्यालयासमोर विष प्राशन केले.
Read Also
कालच्या हायहोल्टेज कारवाईनंतर आज मुंबईच्या महापौर पेडणेकर ‘क्वारंटाईन’https://t.co/6ZToqhWIsJ@KishoriPednekar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 10, 2020