मुंबई : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील पंकजा मुंडे , विनोद तावडे यांची नवे यात समाविष्ट करण्यात आली आहेत . मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा या यादीत समावेश नसल्याचे समोर आले आहे.
जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपची कार्यकारिणी जाहीर होणार होती. मात्र, त्याच दरम्यान कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने ही कार्यकारिणी लांबली. आज अखेर नड्डा यांनी त्यांची टीम जाहीर केली आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून पक्षाच्या राष्ट्रीय महामंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकर आणि सुनिल देवधर यांची वर्णी लागली आहे. तर सहसंघटन मंत्री म्हणून व्ही. सतीश यांची तर अल्पसंख्यक मोर्चावर जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून केवळ 8 जणांचीच वर्णी लागली आहे.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्य कार्यकारिणी घोषित केली होती. त्यात पंकजा मुंडे, तावडे आणि खडसे यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी पाटील यांनी या नेत्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
Read Also :
पवार साहेबांनी अनुपस्थित राहणे म्हणजे कृषी विधेयकाला मूकसंमती…https://t.co/B3ZW4yZ65h#SharadPawar #NCP #KisanBill2020 @Sadabhau_khot
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020