कराड: कृष्णा काठावर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार यावर खलबत चालू होतं. मात्र विरोधी गटातील संस्थापक पॅनलच्या वतीने कारखान्याचे नेते अविनाश मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजूनही अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात समेट होतो न होतो तेच अविनाश मोहितेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या अशातच तिसऱ्या दिवशी निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते,सहकार राज्यमंत्री डॉ. विश्व्जीत कदम यांचे चुलते रघुनाथ श्रीपती कदम, विद्यमान व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह ८४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. तिसऱ्या दिवशी निवडणुकीसाठी माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते,सहकार राज्यमंत्री डॉ. विश्व्जीत कदम यांचे चुलते रघुनाथ श्रीपती कदम, विद्यमान व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्यासह ८४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी २५ मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ जून ही आहे. पहिल्या दोन दिवसात २९ उमेदवारी अर्ज दाखल केले गेले होते. त्यामुळे आजवर ११३ उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत. अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांचे अजूनही मनोमिलन झाले नाही तरी देखील दोघांनी अर्ज भरल्याने चर्चेला वाव मिळाला आहे. डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी जिल्ह्यातील मोठे नेते सरसावले आहेत.
सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांनी मात्र अर्ज भरण्याच्या बाबतीत कमालीची शांतता बाळगली आहे. सत्ताधारी गट विरोधी गटांमध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे आणि त्यामुळेच त्यांनी अजून आपले पत्ते उघडले नाहीत. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरत सत्ताधारी सुरेश भोसले गटाने आघाडी घेतली हाती मात्र त्यानंतर त्यांनी सावध पाऊल उचलले आहे. सत्ताधारी गटाकडून सोमवारी अथवा शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी अर्ज दाखल करण्यात येतील मिळाली आहे.