मुंबई: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यां यांना काही दिवसांपूर्वी एनआयएच्या टीमने अटक केली. त्यानंतर आता प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. एनआयएच्या टीमने प्रदीप शर्मा यांच्या कार्यालयावर छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत भर पडण्याची चिन्ह आहेत.
या छापेमारी संदर्भात न्यूज एजन्सी एएनआयने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, शिवसेना नेते आणि मुंबई पोलीस दलातील माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट असलेले प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशन या एनजीओवर एनआयएच्या पथकाने छापेमारी केली आहे. एनआयएने ही कारवाई नेमकी कुठे केली आहे याबाबत एएनआयने आपल्या ट्विटमध्ये माहिती दिलेली नाहीये. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या एनजीओच्या कार्यालयावर एनआयएच्या टीमने छापा टाकला आहे.
Mumbai: An NIA (National Investigation Agency) raid is underway at Shiv Sena leader and former 'encounter specialist' of Mumbai Police, Pradeep Sharma's NGO – PS Foundation. Details awaited.
— ANI (@ANI) June 23, 2021
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने प्रदीप शर्मा यांना १७ जून रोजी अटक केली. १७ जून रोजी एनआयएच्या टीमने प्रदीप शर्मा यांच्या घरावर सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर एनआयएच्या टीमने लोणावळ्यातून प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेतलं. चौकशीनंतर एनआएने त्यांना अटक केली. प्रदीप शर्मा यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता २८ जूनपर्यंत एनआए कोठडी सुनावण्यात आली आहे.